गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या इंदू नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:56+5:302021-07-10T04:16:56+5:30

गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या इंदू उत्तम नाईक यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीला भाजपाचे प्रकाश पाटील यांनी ...

Indu Naik of Congress as the Deputy Chairman of Gadhinglaj Panchayat Samiti | गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या इंदू नाईक

गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या इंदू नाईक

Next

गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या इंदू उत्तम नाईक यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीला भाजपाचे प्रकाश पाटील यांनी पाठिंबा दिला तर जयश्री तेली व विठ्ठल पाटील यांनी सभेकडे पाठ फिरवली. अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा पीठासन अधिकारी दिनेश पारगे होते.

पंचायत समितीवर राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व स्थानिक ताराराणी आघाडी युतीची सत्ता आहे. स्वाभिमानीच्या इराप्पा हसुरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यासाठी नाईक यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली.

नाईक यांचे नाव बनश्री चौगुले यांनी सुचविले त्यास हसुरी यांनी अनुमोदन दिले. सभेला उपस्थित असलेले भाजपाचे प्रकाश पाटील यांनीही नाईक यांच्या निवडीला पाठिंबा दिला.

निवडीनंतर तहसीलदार दिनेश पारगे यांच्याहस्ते नाईक यांचा तर गटविकास अधिकारी शरद मगर यांच्याहस्ते हसुरी यांचा सत्कार झाला. सभेला सभापती रूपाली कांबळे, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, श्रीया कोणकेरी उपस्थित होते.

फोटो : इंदू नाईक : ०९०७२०२१-गड-०५

Web Title: Indu Naik of Congress as the Deputy Chairman of Gadhinglaj Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.