‘लोकमत’च्या इंदुमती गणेश यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:05 AM2019-07-20T11:05:17+5:302019-07-20T11:36:44+5:30
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिला जाणारा २०१८ चा कोल्हापूर विभागाचा ग. गो. जाधव ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘लोकमत’ कोल्हापूरच्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती मिलिंद गणेश-सूर्यवंशी यांना शुक्रवारी जाहीर झाला. रोख ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात २७ जुलैला दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिला जाणारा २०१८ चा कोल्हापूर विभागाचा ग. गो. जाधव ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ‘लोकमत’ कोल्हापूरच्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती मिलिंद गणेश-सूर्यवंशी यांना शुक्रवारी जाहीर झाला. रोख ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात २७ जुलैला दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन या क्षेत्रात आलेल्या इंदुमती गणेश या ‘लोकमत’मध्ये गेली दहा वर्षे काम करीत आहेत. त्यांना यापूर्वीही हाच पुरस्कार २०१४ साली मिळाला होता. ‘लोकमत’ मध्ये मुख्यत: त्या सांस्कृतिक व धार्मिक घडामोडींचे वार्तांकन करतात.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यातील दुर्लक्ष, कोल्हापूरच्या चित्रनगरीचा रखडलेला विकास, असे विषय त्यांनी सातत्याने मांडले होते. त्यांनी दिलेल्या बातम्यांमुळे अनेक व्यक्ती व संस्थांनाही भरीव मदत झाली. या त्यांच्या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची तज्ज्ञ समितीने निवड केली.