इचलकरंजीत पथकाद्वारे उद्योग-व्यवसायांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:23 AM2021-04-19T04:23:24+5:302021-04-19T04:23:24+5:30
इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योग-व्यवसाय नियमांचे पालन करतात की नाही, याची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने दहा पथकांची नियुक्ती ...
इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योग-व्यवसाय नियमांचे पालन करतात की नाही, याची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने दहा पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पथकांनी शहर व परिसरातील उद्योग-व्यवसायांची पाहणी केली. त्यामुळे व्यवसायधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले असून, त्यानुसारच उद्योग-व्यवसाय सुरू करता येणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दहा पथकांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी अधिकाऱ्यांनी शहर व परिसरातील उत्पादन घटकांची तपासणी केली. तसेच अत्यावश्यक सेवा, निर्यात, निरंतर प्रक्रिया व निवासाची व्यवस्था अशा प्रकारातील उत्पादन घटकांना लॉकडाऊन काळात उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्योग-व्यवसाय सुरू आहे की नाही, याची पाहणी केली. यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली होती.
चौकट
अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ कोल्हापूर विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित पथकाने नेमकी कोणकोणत्या उद्योग-व्यवसायांची पाहणी केली? कितीजणांवर कारवाई केली आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.