कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा, जेल परिसर "सील डाऊन"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 07:04 PM2020-07-03T19:04:46+5:302020-07-03T19:07:43+5:30
सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बेळगांव - सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामूळे कॅम्प पोलीस स्टेशन आणि हिंडलगा जेल परिसर "सील डाऊन" पोलीस कर्मचारी क्वारंटाइन होण्याची शक्यता आहे.
हिंडलगा रोडवरील समृद्धी ज्वेलर्स या सराफी दुकानातील सोन्याची चेन बंदुकीचा धाक दाखवून लंपास केल्याप्रकरणी गेल्या चार दिवसापूर्वी कॅम्प पोलीसांनी एका कुविख्यात दरोडेखोराला गजाआड केले आहे. तथापि आता सदर दरोडेखोराला कोरोनाची बाधा झालीआहे. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानक आणि हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भितीचे वातावरण पसरले आहे.
त्याचप्रमाणे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही मानसिक दडपण आले आहे. कारण ज्यावेळी संबंधित दरोडेखोराला अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी तसेच खडेबाजार आणि कॅम्प पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्गाने मुद्देमालासह आरोपी समवेत प्रसारमाध्यमांसाठी फोटोसेशन केले होते.
गजाआड करण्यात आलेल्या दरोडेखोराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत. कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृह परिसर सील डाऊन केला जाण्याची शक्यता आहे त्याची तयारी देखील सुरू झाली आहे.
हिंडलगा कारागृहात सध्या सुमारे ८३० कैदी आहेत. या कैद्यांना विभागून ठेवण्यात येत असले तरी संबंधित दरोडेखोर कोरोनाबाधित असण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे कारागृहातील पोलीस कर्मचारी व कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
हिंडलगा रोडवरील समृद्धी ज्वेलर्स या सराफी दुकानात गेल्या २७ जून रोजी एका व्यक्तीने सोन्याची चेन पाहण्याच्या निमित्ताने प्रवेश केला होता त्यानंतर त्याने सोन्याची चेन दाखविणार्या दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवून सुमारे तीन लाख रुपये किंमतीची ती सोन्याची चेन मोटरसायकलवरून लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्या दरोडेखोराला अटक करून त्याच्याकडील सोन्याची चेन, एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली होती.