साताऱ्यामध्ये शनिवारी वंध्यत्व निवारण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:34+5:302021-08-25T04:30:34+5:30

कोल्हापूर : सातारा येथे एसटी स्टँडच्या पाठीमागे असणाऱ्या सातारा सुपर स्पेशालिटी पॉलिक्लिनिकमध्ये ...

Infertility Prevention Camp on Saturday in Satara | साताऱ्यामध्ये शनिवारी वंध्यत्व निवारण शिबिर

साताऱ्यामध्ये शनिवारी वंध्यत्व निवारण शिबिर

Next

कोल्हापूर : सातारा येथे एसटी स्टँडच्या पाठीमागे असणाऱ्या सातारा सुपर स्पेशालिटी पॉलिक्लिनिकमध्ये शनिवार, दि. २८ ऑगस्ट रोजी डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या वंध्यत्व निवारण आणि सल्ला, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुनंदा आयव्हीएफ हॉस्पिटलच्या वतीने हे शिबिर घेण्यात येणार आहे. ऑटोमॅटिक सीमेन ॲनालायझर असलेले हे पहिले हॉस्पिटल आहे.

लग्न झाल्यानंतर बाळ होत नसेल तर स्त्री आणि पुरुषांमधील विविध घटक यासाठी कारणीभूत असतात. महिलांच्या बाबतीत गर्भनलिकेचे विकार, वारंवार होणारा गर्भपात, एंडोमेट्रिओसिस, तर पुरुषांच्या बाबतीत शुक्राणू कमी असणे, त्यांची गती कमी असणे, शून्यता, आकारात दोष किंवा खराब गुणवत्ता या कारणांमुळे अपत्यप्राप्ती होत नसते.

सुनंदा आयव्हीएफ हॉस्पिटलच्या वतीने कोल्हापूर, कराड आणि पुणे येथे याबाबत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते. आता सातारा शहर आणि परिसरातील गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वंध्यत्वावर निश्चितच उपाय उपलब्ध असून, त्याचा रोजच्या जगण्यावर ताण येऊ न देता मनातील भीती दूर करून सकारात्मक राहण्याची गरज असते. याबाबतच शास्त्रशुद्ध मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.

Web Title: Infertility Prevention Camp on Saturday in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.