बाप्पाच्या प्रसादालाही यंदा महागाईची चव, मिठाईच्या दरात वाढ 

By सचिन भोसले | Published: September 18, 2023 05:22 PM2023-09-18T17:22:29+5:302023-09-18T17:25:48+5:30

सचिन भोसले कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशोत्सवात बाप्पाला आवडणाऱ्या नैवेद्याला घरोघरी उकडीचे मोदक तयार केले जातात. तरीसुद्धा ...

inflation this year Even Bappa Prasad the price of sweets has increased | बाप्पाच्या प्रसादालाही यंदा महागाईची चव, मिठाईच्या दरात वाढ 

बाप्पाच्या प्रसादालाही यंदा महागाईची चव, मिठाईच्या दरात वाढ 

googlenewsNext

सचिन भोसले

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशोत्सवात बाप्पाला आवडणाऱ्या नैवेद्याला घरोघरी उकडीचे मोदक तयार केले जातात. तरीसुद्धा प्रसादासाठी म्हणून खबा मोदक, लाडू, पेढे, खाजा, मैसूर पाक अशा मिठाईंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यावर्षी कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईची झळ बाप्पाच्या प्रसादालाही बसली आहे.

गणरायाला फळे, मिठाई, घरी केलेला नैवेद्य ठेवण्यात आरती झाल्यानंतर ठेवला जातो. याशिवाय खास गणेशोत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मिठाई देऊन केला जातो. विशेषत: कंदी पेढे, मलई पेढे, मोतीचूर व बुंदीचे लाडू, खवा मोदक, मैसूरपाक, गुलकंद मोदक, बालुशाही, काजू कतली अशा वेगवेगळ्या मिठाई प्रसाद म्हणून येणाऱ्या पाहुण्यांना व रोजच्या आरतीनंतर उपस्थित भाविकांना दिल्या जातात. यंदा कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने मिठाईच्या दरातही वाढ झाली आहे.

दर १० टक्क्यांनी वाढले

पावसाने ओढ दिल्याने तुरीचे पीक कमी आले आहे. त्यामुळे तुरडाळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तुरडाळ क्विंटलमागे १५० रुपयांनी वाढली आहे. घाऊक बाजारात साखर क्विटंलमागे ५० रुपयांनी वाढली आहे. यात डालड्याचेही दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम मिठाई उत्पादनावरही झाला असून, त्याचे दरही १० टक्क्यांनी वाढले आहेत.

दर असे,(कंसात पूर्वीचे दर)

अंबा, गुलकंद, स्ट्राॅबेरी, मलई मोदक - ६८० रुपये (५८० ते ६००) प्रतिकिलो
खाजा - २८० रुपये (२५०) प्रतिकिलो
बालूशाही - २८० रुपये (२६०)
म्हैसूर पाक - ३२० रुपये (२५० ते २७५),
म्हैसूर पाक (तुपातील) - ५६० रुपये (५००)
पेढे - ५२० रुपये (४५० ते ४७५)
मलई पेढे - ६४० रुपये ( ५५० ते ६००)

Web Title: inflation this year Even Bappa Prasad the price of sweets has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.