समाजमाध्यमांचा प्रभाव दुर्लक्षून चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:55+5:302021-02-05T07:11:55+5:30
येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०० वा वर्धापनदिन सोमवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव ...
येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०० वा वर्धापनदिन सोमवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यानी नृत्ये सादर केली. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांनी संस्था कार्याचा आढावा घेतला. देशपांडे म्हणाले, संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत संस्थाचालक आणि गुरुजनांचे मोठे याेगदान राहिले आहे. आमदार जयंत आसगावकर म्हणाले, अनेक अडचणींवर मात करत संस्थेने शताब्दी पूर्ती करणे हे अभिमानास्पद आहे. आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, ही संस्था म्हणजे गुणवत्ता आणि संस्कार याचे माहेरघर आहे.
संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया म्हणाले, केवळ अध्यापन करणे हे ध्येय न ठेवता आमच्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यावेळी १९ सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच माजी शिक्षिका विद्या देशपांडे, रुपाली मोरे, निनाद जोशी, शामली रायबागकर, श्रावणी मगदूम, ओंकार पाटील, अथर्व शिंपुगडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्था सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी यादी वाचन केले. सागर बगाडे, वर्षा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्था सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला अर्चना देशपांडे, संस्थाध्यक्ष पद्माकर सप्रे, विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लोहिया, राजेंद्र मालू, प्रा. एस. के. कुलकर्णी, नेमचंद संघवी, अरुण संघवी, प्रशांत लोहिया, निर्मल लोहिया, राजेश लोहिया, चंद्रकांत जोशी, डॉ. प्रकाश गुणे, प्रा. एस. एस. चव्हाण, उमा भेंडिगिरी, सयाजी पाटील, प्रदीप पोवार उपस्थित होेते.
०१०२२०२१ कोल न्यू एज्युकेशन सोसायटी
येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शंभराव्या वर्धापनदिनी सोमवारी आनंद देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डावीकडून एस. एस. चव्हाण, अनिल लोहिया, नेमचंद संघवी, पद्माकर सप्रे, अर्चना देशपांडे, विनोदकुमार लोहिया, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, नितीन वाडीकर, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे उपस्थित होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)