बेड, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची माहिती वॉर रूमला कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:33+5:302021-04-21T04:24:33+5:30
कोल्हापूर : शहरातील खासगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची माहिती तत्काळ महानगरपालिकेच्या वॉर रूमला कळवावी, अशा सूचना ...
कोल्हापूर : शहरातील खासगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची माहिती तत्काळ महानगरपालिकेच्या वॉर रूमला कळवावी, अशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नियंत्रण अधिकाऱ्यांना दिल्या.
खासगी हॉस्पिटलसाठी नेमलेल्या नियंत्रण अधिकाऱ्यांची प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ही सूचना केली.
शहरातील खासगी रुग्णालयांत बेड उपलब्धेकरिता प्रशासक बलकवडे यांनी १९ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या संपर्क अधिकाऱ्यांवर व रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त, सहायक आयुक्त व पर्यावरण अभियंता अशा ७ नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्त केलेली आहे.
नियंत्रण अधिकाऱ्यांनी रुग्णालयांसाठी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून जसजसे बेड रिक्त होतील. ॲडमिट पेशंट होतील. त्याची तत्काळ माहिती वॉर रूमला कळविण्याबाबतच्या सूचना केल्या. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड याबाबत दैनंदिन पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. या रिक्त बेडची माहिती तत्काळ वॉर रूमशी संपर्क साधून अपडेट करा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.