शेतकºयांची माहिती ‘लोड’: कर्जमाफीच्या याद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:35 AM2017-11-14T01:35:03+5:302017-11-14T01:41:39+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या याद्यात गेले दोन-तीन दिवस त्रुटीचा गोंधळ उडाल्याने संथगतीने काम सुरू होते.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या याद्यात गेले दोन-तीन दिवस त्रुटीचा गोंधळ उडाल्याने संथगतीने काम सुरू होते. सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्याने त्रुटी पटकन सापडत असल्याने कामास गती आली आहे. सोमवारअखेर ९३ हजार ५०० शेतकºयांची माहिती अपलोड केली. अजून १ लाख ६५ हजार शेतकºयांची माहिती भरायची असून, दोन दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे.
कर्जमाफीत सहभागी झालेल्या शेतकºयांची माहिती भरण्याचे काम गेले पंधरा दिवस जिल्हा बँकेत सुरू आहे. राज्याच्या आयटी विभागाकडून रोज एक कॉलम बदलून येतो, तशी माहिती भरली तर त्यात त्रुटी दाखविल्या जात असल्याने सहकार विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. पुणे, सांगली व सातारा जिल्हा बँकांचे काम पूर्ण झाले, कोल्हापूर जिल्हा मागे राहिल्याने सहकार यंत्रणावर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व त्यांची टीम बँकेत तळ ठोकून आहे. विकास संस्थांची संख्या जास्त असल्याने कामाचा निपटारा होत नसल्याने पुणे, सांगली व सातारा जिल्हा बँकेतील आयटी विभागातील अधिकारी सोमवारी दाखल झाले.
जिल्ह्यातील १८५४ विकास संस्थांपैकी ५१८ संस्थांतील ९३ हजार ५०० शेतकºयांची माहिती भरली आहे. अजून १ लाख ६५ हजार शेतकºयांची माहिती भरायची आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने कंंबर कसली आहे.
आठशे पदाधिकाºयांचीमाहिती मिळेना
सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, त्यांची आई व जन्मठिकाणाची माहिती सरकारने मागवली आहे. ‘गोकुळ’ अंतर्गत ३५०, तर जिल्हा बँकेचे अंतर्गत ४५० अशा आठशे पदाधिकाºयांची माहिती अद्याप सहकार विभागाला मिळालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून माहितीबाबत दबाव असल्याने सोमवारी जिल्हा बँक व दुग्ध अधिकाºयांना फैलावर घेतले.
बँक व सहकार विभागात ताणाताणी
सहकार विभागाने अधिकाºयांची संख्या वाढवून कामाचा निपटारा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी संगणकाची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हा बँकेला दिली होती; पण सोमवारी रात्रीपर्यंत संगणक न मिळाल्याने अधिकारी दिवसभर बसून राहिल्याने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे संतप्त झाले. त्यांनी बँकेच्या अधिकाºयांना चांगलेच सुनावले.
सहकार यंत्रणेवर ताण
सोमवारअखेर ९३ हजार ५०० शेतकºयांची माहिती अपलोड केली.
अजून १ लाख ६५ हजार शेतकºयांची माहिती भरावयाची
कोल्हापूर जिल्हा मागे राहिल्याने सहकार यंत्रणावर कमालीचा ताण