लाचखोर आयकर निरीक्षकाची माहिती अधीक्षकांना पाठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:05 AM2020-12-22T11:05:44+5:302020-12-22T11:07:33+5:30

Bribe Case Kolhapur- दहा लाखाची घेतल्याप्रकरणी आयकर विभागातील निरीक्षकाच्या गुन्ह्याच्या तपासाची लेखी माहिती सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळविल्याचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

The information of the corrupt income tax inspector was sent to the superintendent | लाचखोर आयकर निरीक्षकाची माहिती अधीक्षकांना पाठवली

लाचखोर आयकर निरीक्षकाची माहिती अधीक्षकांना पाठवली

Next
ठळक मुद्देलाचखोर आयकर निरीक्षकाची माहिती अधीक्षकांना पाठवली दहा लाखाची लाच प्रकरण : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली चौकशी

कोल्हापूर : दहा लाखाची घेतल्याप्रकरणी आयकर विभागातील निरीक्षकाच्या गुन्ह्याच्या तपासाची लेखी माहिती सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळविल्याचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी दुपारनंतर आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा अधिकृत जबाब आज, मंगळवारी कार्यालयात नोंदविण्यात येणार आहे.

एका डॉक्टरला कारवाईची धमकी देऊन त्याच्याकडून दहा लाखाची लाच घेतल्याप्रकरणी आयकर विभागातील निरीक्षक प्रताप चव्हाण याला शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडे तपासात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती घेतली आहे.

संबंधित लाचखोर निरीक्षक हा केंद्रीय कर्मचारी आहे. संशयित आरोपी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडील आहे. यासह इतर लेखी माहिती सोमवारी कोल्हापूर कार्यालयातून विभागाच्या अधीक्षकांना पाठविली आहे.

लाचखोर चव्हाण याच्या यापूर्वीच्या संशयास्पद हालचाली, त्याची कारस्थाने, त्याची पदोन्नती यासह इतर माहिती सोमवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून घेण्यात आली. 

Web Title: The information of the corrupt income tax inspector was sent to the superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.