इंगळीचे पोलीस पाटील मुल्लाणी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:55+5:302021-08-14T04:30:55+5:30

पट्टणकोडोली : इंगळी (ता. हातकणंगले) येथील पोलीस पाटील जावेद युसुब मुल्लाणी यांच्यावर इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी ...

Ingli police towards Patil Mullani Bad | इंगळीचे पोलीस पाटील मुल्लाणी बडतर्फ

इंगळीचे पोलीस पाटील मुल्लाणी बडतर्फ

googlenewsNext

पट्टणकोडोली : इंगळी (ता. हातकणंगले) येथील पोलीस पाटील जावेद युसुब मुल्लाणी यांच्यावर इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी बडतर्फची कारवाई केली. पोलीस पाटील हे बेजबाबदार, निष्काळजी व काम करण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मुल्लाणी यांच्याविरोधात जब्बार चाँदसो नायकवडे यांनी शासनाच्या विविध विभागात तक्रारी करून बडतर्फ करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, पोलीस पाटील निवडीवेळी दुसरीकडे कोणत्याच ठिकाणी नोकरीस नसल्याचे पोलीस पाटील जावेद मुल्लाणी यांनी शासनास प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र, नोकरीस असतानाही खोटे प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची फसवणूक केली असल्याने मुल्लाणी यांना अपात्र करून निवड सूचीनुसार आपली निवड करावी यासाठी जब्बार नायकवडे यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

इंगळी येथील पोलीस पाटील जावेद इसुब मुल्लाणी हे यांची वर्तवणूक चांगली नसून ते कर्तव्यात कसूर करत असल्याची तक्रार जब्बार चाँदसो नायकवडे आणि काही ग्रामस्थांनी केली होती. हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हातकणंगले तहसीलदार, इचलकरंजी अप्पर तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्याकडून इचलकरंजी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी चौकशी अहवाल मागविले होते. या अहवालानुसार पोलीस पाटील जावेद मुल्लाणी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Ingli police towards Patil Mullani Bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.