अपात्र सभासदांकडून आबिटकर यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:11 AM2017-08-15T00:11:30+5:302017-08-15T00:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : कूर गावातील २१६ शेतकºयांचे ‘बिद्री’चे सभासदत्त्व रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाºयांचा मी अन्याय झालेल्या शेतकºयांच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले. ते कूर (ता. कूर) येथे घेण्यात आलेल्या बिद्री कारखान्याच्या अपात्र सभासदांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय भोपळे होते. प्रमुख उपस्थित उपसरपंच संभाजी कुंभार होते.
जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील म्हणाले, सभासद निकषात सामान्य ऊस उत्पादक होता. म्हणून हा धोरणात्मक निर्णय माजी आमदार के. पी. पाटील यांनी घेतला होता. पण आबिटकर हे ज्या निकषावर सभासद झाले. तो निकष तरी अंतर्मुख होऊन तपासावा. लोकांच्या चुलींत पाणी ओतणाºया या मंडळींना बिद्रीत सर्वांनी लक्ष्मणरेषा घातली आहे.
शंकर प्रभावळे म्हणाले, बिद्रीचे सभासद होताना आमदार व माजी आमदार यांच्या घरातील सभासद होताना त्यांच्या नावावर जमिनी नसल्या तरी चालतात पण गरीब घरातील सभासद वडिलांच्या नावावर जमीन असताना देखील आम्हास अपात्र करण्यासाठी आमदार आबिटकर यांचा पुढाकार का?
माजी जिल्हा परिषद सदस्य पी. डी. पाटील, विष्णुपंत हाळदकर, साताप्पा हाळदकर, सदाशिव हाळदकर, आनासो पाटील, वसंतराव चोडणकर, शशिकांत प्रभावळे, मदन पाटील, धनाजी खोंद्रे, कृष्णात राजिगरे, कृष्णात हाळदकर, अर्जुना कांबळे, उत्तम देशपांडे, दिलीप खाडे, विठ्ठल पाटील, नेताजी पाटील, रघुनाथ सारंग, सदाशिव पाटील, तानाजी पाटील, डी. एस. हाळदकर, डॉ. संदीप पाटील, सुनील भारमल, सुरेंद्र धोंगडे, यशवंत मिसाळ, रंगराव देसाई, बाजीराव राजिगरे, बाबूराव सुतार, बाळासो सारंग, सुनील कांबळे आदी सभासद उपस्थित होते. माजी सरपंच संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार केरबा खाडे यांनी मानले.