शिंदेंनी सोडवला मंगेशकर कुटुंबियांचा कोल्हापुरातील वास्तव्याचा प्रश्न, दीदी आणि शिवाजी पेठेचे होतं ऋणानुबंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 07:26 PM2022-02-06T19:26:09+5:302022-02-06T19:26:45+5:30

माधवरावांच्या शेवटापर्यंत या दोघांची मैत्री कायम राहिली.

Initially, the issue of the Mangeshkar family living in Kolhapur was solved by the then Shivaji Peth Vastad and the first Olympic hero Dinkarrao Shinde | शिंदेंनी सोडवला मंगेशकर कुटुंबियांचा कोल्हापुरातील वास्तव्याचा प्रश्न, दीदी आणि शिवाजी पेठेचे होतं ऋणानुबंध 

शिंदेंनी सोडवला मंगेशकर कुटुंबियांचा कोल्हापुरातील वास्तव्याचा प्रश्न, दीदी आणि शिवाजी पेठेचे होतं ऋणानुबंध 

googlenewsNext

मिलिंद यादव, कोल्हापूर

लतादीदी आणि शिवाजी पेठ हे एक सुंदर असं नातं होतं. सुरुवातीच्या काळात कोल्हापुरातला मंगेशकर कुटुंबियांचा वास्तव्याचा प्रश्न, त्यावेळेचे शिवाजी पेठेचे वस्ताद आणि पहिले ऑलिंपिक वीर दिनकरराव शिंदे यांनी सोडवला होता. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीय आणि शिंदे कुटुंबीय यांचा एक घरोबा तयार झाला. 

लहानपणी लतादीदी, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर ही बहिण भावंड कोल्हापूरला आल्यानंतर शिंदे यांच्या घरातच राहायचे. आजही शिवाजी पेठेतल्या उभा मारुती चौकात दिनकरराव शिंदे यांचे घर अगदी त्याच अवस्थेत आहे. दिनकरराव शिंदे यांची आई आनंदीबाई यांनी या मंगेशकर बहिण भावंडांना लहानपणी, (ते जेंव्हा जेंव्हा रहायला येतील तेंव्हा), त्यांना तेल लावून आंघोळ घालत असत. शिंदे यांचं घर हे या भावंडांसाठी सुट्टीला कोल्हापूरला आल्यानंतरचे राहण्याचे हक्काचे घर होते. 

लहानाची मोठी होता होता दिनकरराव शिंदे यांचे धाकटे बंधू माधवराव शिंदे (माधवराव शिंदे हे माझे चुलत आजे सासरे) सुरुवातीला राजाराम महाराजांच्या इच्छेनुसार त्यांना जॉकी करण्याचा प्रयत्न झाला. पण ते त्यात फारसे रमले नाहीत. मग मास्टर विनायक रावांच्या बरोबर, त्यांच्या लॅब मध्ये काम करता करता माधवराव मराठी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम दिग्दर्शक झाले. 



माधवराव आणि लता दीदींचे सुर जुळले 

अतिशय शांत स्वभावाचे असे माधवराव आणि लता दीदी यांचे सुर जुळले आणि त्यांनी एकत्र येऊन चित्रपट सृष्टी मधील आपली वाटचाल सुरू केली. माधवराव, लतादीदी व दिनकर पाटील यांनी एकत्र येऊन १९५२ ला ' सुरेल चित्र ' सुरु केले. या बॅनर खाली तयार झालेली ' वादळ ' व' कांचनगंगा ' हे सिनेमे अतिशय गाजले. पुढे आपल्या कामाच्या व्यापातून लता मंगेशकर यांनी सुरेलमधून आपले अंग काढून घेतले. पण अगदी माधवरावांच्या शेवटापर्यंत या दोघांची मैत्री कायम राहिली.

Web Title: Initially, the issue of the Mangeshkar family living in Kolhapur was solved by the then Shivaji Peth Vastad and the first Olympic hero Dinkarrao Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.