वंचित, दुर्बल घटकांतील बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू
By Admin | Published: March 3, 2015 10:51 PM2015-03-03T22:51:46+5:302015-03-03T23:03:17+5:30
महानगरपालिका : शिक्षण मंडळाकडून कार्यवाही
कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आरटीई) नुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांसाठी २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यातील आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत १२ मार्चपर्यंत आहे.आरटीई अंतर्गत पात्र खासगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांसाठी पात्र बालके राखीव प्रवेशाच्या २५ टक्के जागांपासून वंचित राहू नयेत म्हणून महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. (१३ी25ंरि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल) या संकेतस्थळावर बालकाचा आॅनलाईन अर्ज स्वत: भरण्याचा आहे. संकेतस्थळ शोधताना सुरुवातीला (६६६) हे लावू नये. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित शाळेमध्ये निश्चित झालेले प्रवेश घेण्याचा कालावधी १२ ते १८ मार्च असा आहे. (प्रतिनिधी)
प्रवेशासाठीचे निकष, आवश्यक कागदपत्रे अशी...
वंचित घटक : एस. सी., अथवा एस. टी. संवर्ग जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे). तहसीलदार अथवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
दुर्बल घटक : एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), शासनाने विनिर्दिष्ट केलेले धार्मिक अल्पसंख्यांकसह इतर सर्व.
अपंग : ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र.
रहिवासी पुरावा, जन्मदाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.