गडहिंग्लजवर शासनाकडून ‘अन्याय’!

By admin | Published: April 4, 2016 01:01 AM2016-04-04T01:01:32+5:302016-04-04T01:01:32+5:30

निधीसाठी कोंडी : नागरी सुविधांसाठी मिळेना साथ; नागरिकांची भावना

'Injustice' to Godhanglaj! | गडहिंग्लजवर शासनाकडून ‘अन्याय’!

गडहिंग्लजवर शासनाकडून ‘अन्याय’!

Next

राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
गोवा व कोकणचे प्रवेशद्वार आणि जिल्ह्याची दक्षिण राजधानी मानल्या जाणाऱ्या गडहिंग्लजनगरीतील नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करताना राज्याकडूनच वेळोवेळी कोंडी झाली. मात्र, मदतीची अपेक्षा असतानाच नाट्यगृहासाठी दिलेला पाच कोटींचा निधी सरकारने परत घेतला आहे. त्यामुळे गडहिंग्लजनगरीवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
कोल्हापूरपासून दक्षिणेस ७० किलोमीटरवर गडहिंग्लज आहे. सुमारे १०० ते १५० किलोमीटर परिघातील या तीनही तालुक्यांचे केंद्र म्हणून १९६० च्या दशकात गडहिंग्लजमध्ये प्रांत कचेरी सुरू झाली. त्यासाठी भाड्याने दिलेल्या नगरपालिकेच्या धर्मशाळेची इमारतही शासनाने वर्षापूर्वीच प्रांत कचेरीच्या नावावर करून पालिकेवर अन्याय केला. पाठोपाठ नाट्यगृहाचा दिलेला निधी परत घेऊन सरकारने पुन्हा शहरवासीयांवर अन्याय केला.
गेल्या ५० वर्षांत सीमाभागातील महत्त्वाचे वैद्यकीय व शैक्षणिक केंद्र म्हणून ही नगरी विकसित झाली. लोकवस्ती ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. उत्पन्नाच्या मर्यादेमुळे येथील ‘क’ वर्ग नगरपालिकेवर सुविधांचा ताण आहे. अपेक्षित विकासासाठी पाठपुरावा झाला. मात्र, पालिकेतील सत्ताधारी व सरकार यांचा सूर जमलाच नाही.
४जिल्ह्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ आणि दुर्गम तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी सर्व उपविभागीय कार्यालये गडहिंग्लजमध्येच सुरू केली आहेत. त्यामुळेही नागरी सुविधांचा ताण वाढला.
४ प्रांत कचेरीबरोबरच जिल्हा व सत्र न्यायालय, पोलिस, पाटबंधारे, कृषी, दूरसंचार, या खात्यांची उपविभागीय कार्यालये येथे आहेत.
४दोनवेळचा अपवाद वगळता तीन दशके गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता आघाडीचीच सत्ता आहे. तरीही माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासह बहुतेक मुख्यमंत्र्यांनी मतभेद बाजूला ठेवून गडहिंग्लजला मदत केली.
४गतवेळच्या निवडणुकीत १०० कोटींचा निधी आणण्याचे आश्वासन देऊन राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता हस्तगत केली. मात्र, युतीचे सरकार आल्यामुळे फारसा निधी मिळाला नाही.
४सहा महिन्यांपूर्वी जनता दलाने राष्ट्रवादीकडून पुन्हा येथील सत्ता ताब्यात घेतली. नंतर मुश्रीफ यांचे विरोधक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनता दलाला जवळ केले. त्यांच्यासाठीच विधान परिषदेत महादेवराव महाडिक यांना जनता दलाने मदत केली.
४मात्र, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत ‘दादा’ आणि ‘जनता दला’चे बिनसले. यामुळेच नाट्यगृहाचा पाच कोटींचा निधी परत घेतल्याची चर्चा आहे.
गडहिंग्लज नगरपालिकेचा पाच कोटी रुपयांचा निधी इतर नगरपालिकेकडे वळविण्यात कोणतेही राजकारण नाही. कारण चार-पाच महिन्यांपूर्वी गडहिंग्लज नगरपालिकेला निधी देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा याच नगरपालिकेला निधी देण्यापेक्षा ज्यांना निधी मिळालेला नाही, अशा इचलकरंजी, पन्हाळा, मलकापूर, कुरुंदवाड व मुरगूड या पाच नगरपालिकांकडे निधी वळविण्यात आला आहे. तसेच नगरविकास खात्यानेच हा निर्णय घेतला असल्याने यामध्ये कोणतेही राजकारण नसून हा प्रशासकीय भाग आहे.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री

Web Title: 'Injustice' to Godhanglaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.