कळंबा कारागृहात शिपायाच्या सॉक्समध्ये सापडली बंदीजनांची चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 10:48 AM2021-02-02T10:48:51+5:302021-02-02T10:50:52+5:30

Crimenews Kolhpaur-मोबाईल, गांजा प्रकरणावरून कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असतानाच, आता कारागृहातील शिपायाच्या बुटामध्ये बंदीजनाने लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात राबविलेल्या कर्मचाऱ्यांच्या झडती मोहिमेत प्रकार उघडकीस आला. किसन बिरलिंगे असे या शिपायाचे नाव आहे. त्याच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली.

Inmate's letter found in soldier's socks in Kalamba jail | कळंबा कारागृहात शिपायाच्या सॉक्समध्ये सापडली बंदीजनांची चिठ्ठी

कळंबा कारागृहात शिपायाच्या सॉक्समध्ये सापडली बंदीजनांची चिठ्ठी

googlenewsNext
ठळक मुद्देकळंबा कारागृहात शिपायाच्या सॉक्समध्ये सापडली बंदीजनांची चिठ्ठी चिठ्ठीवर २५ हजारांच्या मागणीचा निरोप : कर्मचाऱ्यांच्या झडतीत प्रकार चव्हाट्यावर

कोल्हापूर : मोबाईल, गांजा प्रकरणावरून कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असतानाच, आता कारागृहातील शिपायाच्या बुटामध्ये बंदीजनाने लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात राबविलेल्या कर्मचाऱ्यांच्या झडती मोहिमेत प्रकार उघडकीस आला. किसन बिरलिंगे असे या शिपायाचे नाव आहे. त्याच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली.

कळंबा कारागृहातील मोबाईल प्रकरण चव्हाट्यावर आल्याने काही बंदीजनांनी शिपायामार्फत नातेवाईकांना चिठ्ठ्या पाठवण्याचा फंडा सुरू केला. याची माहिती मिळाल्याने शनिवारी कारागृहातील शिपायांची झडती घेतली. एका शिपयाच्या बुटाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या आढळल्या. चिठ्ठीवर असलेल्या नावाच्या संबधित बंदीच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी आपला संबंध नसल्याचे हात वर केले, असेही अधीक्षक इंदूरकर यांनी सांगितले.

चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला २५ हजार रुपये द्या...

गेल्या महिन्यात कारागृहात सापडलेला मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा ठपका एका पोलीस शिपायावर ठेवण्यात आला. त्यानंतर आता आणखी एका पोलीस शिपायाच्या सॉस्कमध्ये बंदीजनांची चिठ्ठी सापडणे म्हणजे गंभीर आहे. शिपाई बिरलिंगे याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवर, माझे अर्जट काम आहे, मला २५ हजार रुपये लागणार आहेत, चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला २५ हजार रुपये द्यावेत, असा मजकूर लिहिला आहे.

Web Title: Inmate's letter found in soldier's socks in Kalamba jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.