कोल्हापूर बिंदू चौकात सिटीझन फोरम यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे अभिनव आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:09 AM2019-11-27T11:09:29+5:302019-11-27T11:11:29+5:30

विविध पक्षांकडून लोकशाहीची आणि मतदारांची थट्टा करीत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लवकरच हे राजकीय नाट्य थांबविले नाही तर सर्वच राजकीय पक्षांविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल.

Innovation movement of all party workers including Citizens Forum at Kolhapur Bindu Chowk; 'Self-contemplation' over political instability | कोल्हापूर बिंदू चौकात सिटीझन फोरम यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे अभिनव आंदोलन  

 सिटीझन फोरमच्यावतीने राज्यात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेसंदर्भात मंगळवारी बिंदू चौकात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक, बंडा साळोखे, गौरव लांडगे, संपतराव-पाटील, अवधूत भाट्ये, सचिन तोडकर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देयाउलट ज्यांनी मतदानच केले नाही, अशांकडून बरं झाले आपण मतदान केले नाही, अशी चर्चा सुरू झाली आहेराजकीय अस्थिरतेबाबत ‘आत्मचिंतन’

कोल्हापूर : राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बिंदू चौकात मंगळवारी सिटीझन फोरमच्यावतीने आत्मचिंतन व आत्मक्लेश आंदोलन केले. दिवसभर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी येथे ठिय्या मारून अभिनव आंदोलन केले.

सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव म्हणाले, राज्यातील मतदारांनी मते देऊन आपल्या पसंतीच्या पक्षाच्या उमेदवाराला विधान भवनात पाठविले; पण गेले महिनाभर मतदारांच्या मताचा व लोकशाहीचा अनादर होत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. ही परिस्थिती पाहून ज्या मतदारांनी मतदान केले, त्यांना पश्चात्ताप होत आहे. याउलट ज्यांनी मतदानच केले नाही, अशांकडून बरं झाले आपण मतदान केले नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून लोकशाहीची आणि मतदारांची थट्टा करीत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लवकरच हे राजकीय नाट्य थांबविले नाही तर सर्वच राजकीय पक्षांविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल.

फोरमचे सचिव प्रकाश सरनाईक म्हणाले, राज्यभरातील महापुरामुळे शेतकरी, कष्टकरी हवालदिल झाला आहे. त्यांना तत्काळ मदत करणे आवश्यक असताना सत्ता संघर्ष सुरू आहे. तातडीने सरकार स्थापन करण्याची राजकीय पक्षांना सद्बुद्धी मिळावी, या उद्देशाने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे बंडा साळोखे, गौरव लांडगे, संपतराव पवार-पाटील, अवधूत भाट्ये, सुनील पाटील, सचिन तोडकर, सेवासंघाचे चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, गणेश लाड, केशव माने, अजित नलवडे, महादेव जाधव, वैभवराजे राजेभोसले, वैभव हिलगे, बाळासाहेब भोसले, राजवर्धन यादव, अखतार इनामदार, सचिन बिरांजे, विशाल शिराळकर, अमोल कुरणे, महादेव विभूते उपस्थित होते.
 

 

Web Title: Innovation movement of all party workers including Citizens Forum at Kolhapur Bindu Chowk; 'Self-contemplation' over political instability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.