निष्क्रियतेने ‘सीपीआर’चा निधी परत

By admin | Published: April 16, 2015 12:18 AM2015-04-16T00:18:58+5:302015-04-16T00:23:25+5:30

शिवसेनेचे आंदोलन : अधिष्ठाता हटविण्याची, आवश्यक उपकरणे घेण्याची मागणी

Inoperative 'CPR' funds back | निष्क्रियतेने ‘सीपीआर’चा निधी परत

निष्क्रियतेने ‘सीपीआर’चा निधी परत

Next

कोल्हापूर : निष्क्रिय, कामचुकार प्रशासनामुळेच छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचा (सीपीआर) विविध उपकरणे खरेदीसाठीचा शासकीय निधी परत गेला आहे. त्याला जबाबदार असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी व्हावी शिवाय राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांना धारेवर धरले.
‘हटवा, हटवा अधिष्ठाता हटाव’, ‘निष्क्रिय प्रशासनाचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवसेनेच्या शिष्टमंडळासह कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश केला. अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे कक्षात नसल्याने शिष्टमंडळाशी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांनी चर्चा सुरू केली. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सीपीआरमधील डॉक्टरांमध्ये व्यावसायिकपणा आल्यामुळे या रुग्णालयाला अवकळा आली आहे. सीटी स्कॅन मशिनरी, व्हेंटिलेटर आदी उपकरणांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळूनदेखील रुग्णालय प्रशासनाच्या लालफितीचा कारभार आणि उपकरणे खरेदीतील ‘अर्थ’पूर्ण व्यवहारामुळे निधी परत गेला आहे.
शिष्टमंडळाने एक तासाहून अधिकवेळ डॉ. थोरात, मेडिकल सुपरिटेंड डॉ. डी. ए. पावले, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे समन्वयक डॉ. देठे यांना धारेवर धरले. यावेळी कमलाकर जगदाळे, शुभांगी साळोखे, नगरसेवक राजू हुंबे, दिलीप पाटील-कावणेकर, रवी चौगुले, विराज पाटील, शशी बिडकर, तानाजी मिठारी, सुजाता सोहनी, रणजित आयरेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Inoperative 'CPR' funds back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.