पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा - खासदार माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:37+5:302021-07-28T04:26:37+5:30
खोची : पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान झालेल्या सर्वांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, अशा सूचना खासदार धैर्यशील माने ...
खोची : पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान झालेल्या सर्वांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा, अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार या पूरग्रस्त गावांचा दौरा खासदार माने यांनी केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ग्रामस्थांनी अनेक अडचणी सांगून पुनर्वसनाच्या संदर्भात आग्रही भूमिका मांडली. खोची-दुधगाव येथील नवीन पुलाच्या भरावामुळे पाणी अडते. त्याची फुग राहून पाणी विस्तारते. या ठिकाणी कॉलम उभा करून भराव काढावा, अशी मागणी भेंडवडे येथील ग्रामस्थांनी केली. नुकसानभारपाईच्या निकषांत शिथिलता आणावी, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण यादव, सर्जेराव माने, सरपंच काकासाहेब चव्हाण, बाळासाहेब पाटील, अभिजित माने, राहुल पाटील, महावीर कांबळे, मंडल अधिकारी गणेश बर्गे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, साताप्पा भवान, सुहास देसाई, उदय माने, जगदीश पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अभिजित चव्हाण, खोचीच्या सरपंच रिना शिंदे, शंकर शिंदे, राम पाटील, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - भेंडवडे येथील पूरग्रस्तांशी खासदार धैर्यशील माने यांनी चर्चा केली. यावेळी सर्जेराव माने, मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर, प्रवीण यादव उपस्थित होते. (छाया- आयुब मुल्ला)