कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ कामांची चौकशी करा

By admin | Published: May 30, 2017 04:38 PM2017-05-30T16:38:35+5:302017-05-30T16:38:35+5:30

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अधिकारी-ठेकेदारांनी योजना लुटल्याचा आरोप

Inquiries of 'Jalakit' works in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ कामांची चौकशी करा

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ कामांची चौकशी करा

Next

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : जलयुक्त योजनेतून जिल्ह्यात झालेल्या कामांची जबाबदार अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली.

गगनबावडा तालुक्यातील साखरी-म्हाळुंगे कामात अधिकारी व ठेकेदाराने मोठा ढपला पाडला असून तालुक्यातील सर्वच कामे संगनमताने लुटल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. ‘जलयुक्त’ मधील कामातील भ्रष्टाचाराबाबत मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. कृषी, वन विभागाच्या कारभाराच्या पंचनामा करणाऱ्या घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरून पाण्याची पातळीत वाढ व्हावा, हा चांगला हेतू ‘जलयुक्त’ बाबत सरकारचा आहे. पण दुर्देवाने हा हेतू बासनात गुंडाळून ठेवण्याची करामत काही अधिकाऱ्यांनी केली आहे. अनेक तालुक्यात निकृष्ट दर्जाची कामे झाली असून पाणी मुरूण्याऐवजी पैसे मुरवण्याचे काम अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

गेले दोन वर्षात जिल्ह्यात ’जलयुक्त’ची झालेल्या कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करावी, त्यातून वस्तूस्थिती समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. कुंभोज, तमदलगे येथे झालेल्या ‘जलयुक्त’च्या कामाची चौकशी झाली पण अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांनीच हा अहवाल दडपला आहे. तो खुला करा म्हणजे बडे मासे सापडतील, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. यावर ‘जलयुक्त’च्या झालेल्या कामांची माहिती घेऊन चौकशीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

यावेळी दादांना अधिकाऱ्यांनी फसवले!

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ‘जलयुक्त’ बाबतची भूमिका चांगली आहे. पण यापुर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर वस्तूस्थिती ठेवली नसल्याने या कामांचा बोजवारा उडला आहे. दादांना अधिकाऱ्यांनी फसवल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

‘साखरी-म्हाळुंगे’ प्रकरणी पैसे दिले कोणाला?

साखरी-म्हाळुंगे येथील निकृष्ट कामाचा शिवसेनेने पर्दाफाश केला. त्यावेळी कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी थेट आॅफर देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. त्यापुढेही जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला तीन लाख दिल्याचे म्हटले, पण परीट यांनी हे पैसे दिले कोणाला आणि घेतले कोणी याचे नाव जाहीर त्यांनी जाहीर करावे अन्यथा कायदेशीर मार्गाने शोधून काढू, असा इशारा पवार यांनी दिला.

Web Title: Inquiries of 'Jalakit' works in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.