प्रारूप मतदार यादीवरील हरकतींबाबत प्रशासक बलकवडे यांच्याकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:20+5:302021-02-27T04:32:20+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरील आलेल्या हरकतींबाबत विभागीय कार्यालय स्तरावर प्रत्यक्ष प्रभागात सुरू असलेल्या कामकाजाची शुक्रवारी प्रशासक ...

Inquiry by Administrator Balkwade regarding objections on the draft voter list | प्रारूप मतदार यादीवरील हरकतींबाबत प्रशासक बलकवडे यांच्याकडून तपासणी

प्रारूप मतदार यादीवरील हरकतींबाबत प्रशासक बलकवडे यांच्याकडून तपासणी

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरील आलेल्या हरकतींबाबत विभागीय कार्यालय स्तरावर प्रत्यक्ष प्रभागात सुरू असलेल्या कामकाजाची शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले.

महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक १ ते ८१ च्या प्रारूप मतदार यादीवर दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. यावेळी विभागीय कार्यालयनिहाय एकूण १८०० हरकती प्राप्त झालेल्या आहेत. यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ४९९, विभागीय कार्यालय क्रमांक २ अंतर्गत ६२७, विभागीय कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत ३६४, विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत ३१० हरकती प्राप्त झालेल्या आहेत.

या हरकतींची महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी समक्ष जागेवर जाऊन पडताळणी करत आहेत. प्रशासक बलकवडे यांनी कदमवाडी, भोसलेवाडी, सासने मैदान, शाहूपुरी येथील काही भाग, मंगळवार पेठ, शिंगोशी मार्केट या भागांत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी व पडताळणी केली. बलकवडे यांनी स्वत: तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी उपआयुक्त ‍रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रावसाहेब चव्हाण, त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक व बीएलओ उपस्थित होते.

Web Title: Inquiry by Administrator Balkwade regarding objections on the draft voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.