कळंबा"" प्रकरणी नगरसेविकेच्या पतीसह पाचजणांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:56+5:302020-12-27T04:18:56+5:30
इचलकरंजी : कोल्हापूर येथील कळंबा कारागृहामध्ये मोबाईल, गांजा व इतर साहित्य टाकल्या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ...
इचलकरंजी : कोल्हापूर येथील कळंबा कारागृहामध्ये मोबाईल, गांजा व इतर साहित्य टाकल्या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील एका नगरसेविकेच्या पतीसह अन्य पाचजणांची चौकशी करण्यात आली. परंतु, त्यामध्ये ठोस काही हाती लागले नसल्याचे पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी सांगितले.
इचलकरंजीतील अनेक गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे शंभरावर संशयित कारागृहात आहेत. त्यांच्या संबंधित कोणी मोबाईल, गांजा व इतर साहित्य आतमध्ये फेकले आहे का? या संशयाने तपास करण्यात आला. त्यामध्ये एका नगरसेविकेचा मुलगा कारागृहात असल्याने त्यांच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर एका मोक्का प्रकरणातील संशयित आरोपीच्या भावाची व त्याच्या अन्य तीन मित्रांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये अद्याप ठोस असे काही आढळले नाही. तसेच अजून काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे.