सामान्य नागरिकाप्रमाणे रस्त्याची पाहणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:11+5:302021-03-10T04:25:11+5:30
येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ ...
येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. रस्त्यांवरील खड्डे भरणे, रंगरंगोटी करणे, आदी स्वरूपातील कामे पीडब्ल्यूडी म्यॅनुअलप्रमाणे करावीत, त्याचा आढावा घ्यावा, असलेल्या रस्त्याला गुणवत्तापूर्ण करावे, ब्लॅक स्पॉटबाबत तालुकास्तरीय समितीकडून माहिती घेऊन काम करावे, साईटवर जाऊन पाहणी केली पाहिजे, अशा सूचना एस. एस. माने यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता एस. डी. सोनवणे, तुषार बुरूड, संजय काटकर (कोल्हापूर), सुजित काटकर (सांगली) आदी उपस्थित होते.
चौकट
‘स्पीडब्रेकर’वर जास्त अपघात
मागीलवर्षी स्पीडब्रेकरवर जास्त अपघात घडले आहेत. उंच स्पीडब्रेकर घातक आहेत. या ब्रेकरवर पट्टे मारणे ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण ती अपेक्षित वेगाने होत नाही. वाहकांच्या चुकांमुळे अपघात होतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय कन्सल्टंट-इंजिनिअर-वकील अशी समिती नेमली असल्याचे माने यांनी सांगितले.
एस. एस. माने म्हणाले
शून्य टक्के अपघात होणे म्हणजे आपण यशस्वी झाल्याचे समजावे.
ठेकेदाराकडून रस्त्यावरील खड्डे वारंवार भरून घ्यावेत.
गावाच्या दोन्ही बाजूला पट्टे मारा, आतील रस्त्यावर स्पीडब्रेकर करून त्यावर कॅटेज मारा.
फोटो (०९०३२०२१-कोल-रस्ता सुरक्षा कार्यक्रम) : कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा महिना कार्यक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी स्नेहा गिरी, रोहित काटकर, आदी उपस्थित होते.