भोगावती नदीतील जैव कचऱ्याची प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:50+5:302021-01-02T04:19:50+5:30
बुधवारी अज्ञाताने दवाखान्यात वापरलेल्या जैव वैद्यकीय कचरा बेमालूमपणे भोगावती नदीच्या पात्रात टाकण्याचा प्रकार केला होता. ...
बुधवारी अज्ञाताने दवाखान्यात वापरलेल्या जैव वैद्यकीय कचरा बेमालूमपणे भोगावती नदीच्या पात्रात टाकण्याचा प्रकार केला होता. जेथे जैव वैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. त्याच्या ५०० मीटरवर शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग हाऊस आहे, नागदेववाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, खुपिरे, साबळेवाडी अशी दहा गावे व शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. या कचऱ्यामुळे दूषित पाणी थेट पिण्यासाठी जाते. यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू आहेत.
आज मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, जयवंत पाटील (भामटे), साताप्पा जाधव, अनिकेत पाटील ,अतुल ढेंगे (बालिंगा), राम पाटील, शहाजी कांबळे ,सुरेश कांबळे, शेखर देशमुख, रघुनाथ कांबळे, संतोष जाधव यांनी पाण्यात पडलेल्या सुया व परिसरात विखुरलेल्या सुया एकत्र केल्या तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिकारी वर्षा कदम व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सायंकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला.
(फोटो कँप्शन)
प्रदूषण मंडळाच्या अधिकारी वर्षा कदम व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सायंकाळी बालिंगा पुलाजवळील नदीपात्रात टाकण्यात आलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्याची पाहणी करून पंचनामा केला.
३१ भोगावती नदी पाहणी