गारगोटीत नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:13+5:302021-04-29T04:18:13+5:30
तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गारगोटी ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात नागरिकांची तपासणी करण्यास बुधवारी सुरुवात केली. या तपासणीस ...
तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गारगोटी ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात नागरिकांची तपासणी करण्यास बुधवारी सुरुवात केली. या तपासणीस सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संदेश भोपळे यांनी केले.
ही तपासणी प्रभागनिहाय होत असून एकूण २० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, ३६०० कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी बंधनकारक आहे, अशी माहिती सरपंच संदेश भोपळे यांनी दिली.
या तपासणी मोहिमेस सुरुवात झाल्यानंतर सरपंच संदेश भोपळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, प्रकाश वास्कर, अलकेश कांदळकर, सचिन देसाई,जयवंत गोरे, सचिन देसाई, विजय कोटकर, बजरंग कुरळे, जितेंद्र भाट,गौतम कांबळे, तलाठी राजन शिंदे यांच्यासह सर्व सदस्य आपापली प्रभागनिहाय तपासणी पथकास मदत करण्यासाठी पथकासोबत होते.
फोटो : २८ गारगोटी तपासणी
ओळ -
गारगोटीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच संदेश भोपळे, तलाठी राजन शिंदे, प्रा.विजय कोटकर आदी