अब्दुललाट येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:04+5:302021-06-06T04:18:04+5:30
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गाव हॉटस्पॉट बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ...
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गाव हॉटस्पॉट बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. शासकीय पातळीवर या सेंटरला मंजुरी मिळाल्यानंतर पैशाची कमतरता होती. पण गावातील दानशूर व्यक्तींकडून किंबहुना लोकवर्गणीतून १३ लाख रुपये जमवून हे सेंटर चालू केले. यावेळी जिल्हाधिकारी यानी गावातील परिस्थितीचा आढावा घेत संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे, जि. प. सदस्य विजय भोजे, प्रांताधिकारी विकास खरात, एस. के पाटील, दशरथ काळे, विद्याधर कुलकर्णी, मिलिंद कुरणे, ग्रामसेवक राहुल माळगे, डॉ. भूषण यमाटे, सरपंच पांडूरंग मोरे, दादा सांगावे, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ०४ अब्दुललाट कलेक्टर
ओळ : अब्दुललाट, ता. शिरोळ येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली.