‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:22+5:302021-06-22T04:18:22+5:30
पालकमंत्री पाटील यांनी आमदार जाधव, ‘सारथी’चे संकल्पक आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक ...
पालकमंत्री पाटील यांनी आमदार जाधव, ‘सारथी’चे संकल्पक आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ‘सारथी’चे व्यवस्थापकीय अधिकारी अशोक पाटील, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, सकल मराठा समाजातील अवधूत पाटील, प्रताप नाईक यांच्यासमवेत सोमवारी दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही जागांची पाहणी केली. तेथील प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी या जागांची तांत्रिक माहिती संकलित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
प्रतिक्रिया
‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी केली आहे. या जागांची तांत्रिक माहिती संकलित करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत पुन्हा या जागांची पाहणी करण्यात येईल. त्यावेळी यापैकी एक जागा उपकेंद्रासाठी निश्चित केली जाईल.
-सतेज पाटील, पालकमंत्री.
चौकट
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहात कोविड सेंटर
सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील परिसरात गेल्या दोन वर्षांपूर्वी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू करण्यात आले. कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून येथील विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत. या वसतिगृहात गेल्यावर्षी आणि यंदा कोविड केअर सेंटर करण्यात आले आहे.
फोटो (२१०६२०२१-कोल-सारथी जागा पाहणी) : कोल्हापुरात होणाऱ्या ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्राकरिता शहरातील राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी शेजारी अशोक पाटील, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे, आदी उपस्थित होते.