maratha Kolhapur : सारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी: शनिवारी होणार निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 01:24 PM2021-06-22T13:24:07+5:302021-06-22T13:26:56+5:30

maratha Kolhapur : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सकल मराठा समाजातील समन्वय, आदींनी सोमवारी शहरातील चार जागांची पाहणी केली.

Inspection of four places in the city for Sarathi substation: Confirmation to be made on Saturday | maratha Kolhapur : सारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी: शनिवारी होणार निश्चिती

कोल्हापुरात होणाऱ्या सारथी संस्थेच्या उपकेंद्राकरिता शहरातील राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी शेजारी अशोक पाटील, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी: शनिवारी होणार निश्चिती शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय परिसरातील जागांचा समावेश

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सकल मराठा समाजातील समन्वय, आदींनी सोमवारी शहरातील चार जागांची पाहणी केली.

शिवाजी विद्यापीठ (राजेंद्रनगरकडील परिसर), राजाराम महाविद्यालय (प्री-आयएएस ट्रेनिंगजवळील परिसर), विचारेमाळ येथील समाजकल्याण विभाग आणि सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांचा समावेश होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शनिवारी पुन्हा पाहणी करून यापैकी एक जागा उपकेंद्रासाठी निश्चित केली जाणार आहे.

पालकमंत्री पाटील यांनी आमदार जाधव, ह्यसारथीह्णचे संकल्पक आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ह्यसारथीह्णचे व्यवस्थापकीय अधिकारी अशोक पाटील, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, सकल मराठा समाजातील अवधूत पाटील, प्रताप नाईक यांच्यासमवेत सोमवारी दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही जागांची पाहणी केली. तेथील प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी या जागांची तांत्रिक माहिती संकलित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.


सारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी केली आहे. या जागांची तांत्रिक माहिती संकलित करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत पुन्हा या जागांची पाहणी करण्यात येईल. त्यावेळी यापैकी एक जागा उपकेंद्रासाठी निश्चित केली जाईल.
-सतेज पाटील,
पालकमंत्री.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहात कोविड सेंटर

सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील परिसरात गेल्या दोन वर्षांपूर्वी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू करण्यात आले. कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून येथील विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत. या वसतिगृहात गेल्यावर्षी आणि यंदा कोविड केअर सेंटर करण्यात आले आहे.
 

Web Title: Inspection of four places in the city for Sarathi substation: Confirmation to be made on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.