यड्रावमध्ये मलेरियाप्रतिबंधक भरारीपथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:12+5:302021-07-22T04:16:12+5:30

येथील प्रभाग क्रमांक पाच व सहामध्ये चिकुनगुन्या, डेंग्यू, मलेरियासदृश आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर ...

Inspection by Malaria Prevention Squad in Yadrav | यड्रावमध्ये मलेरियाप्रतिबंधक भरारीपथकाकडून पाहणी

यड्रावमध्ये मलेरियाप्रतिबंधक भरारीपथकाकडून पाहणी

Next

येथील प्रभाग क्रमांक पाच व सहामध्ये चिकुनगुन्या, डेंग्यू, मलेरियासदृश आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेमध्ये माहिती दिली.

या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मलेरियाप्रतिबंधक भरारीपथक एम. जी. वड्ड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंदे, ऋषिकेश परुळेकर, मानसिंग वडर, उमेश गुरव, सूरज तराळ, किरण एरंडोले, बाबर यांनी परिसराची पाहणी केली. प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या अळ्या, डास याची ग्रामस्थांना माहिती दिली. पाणी साचू नये, याबाबत दक्षता घेण्यास सांगितले. ग्रामपंचायतीस ग्रामस्थांसाठी सावधानता व उपाययोजनाकरिता पत्रके वाटण्याची सूचना करण्यात आली.

गुरुवारपासून घरोघरी जाऊन या पथकाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत .याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, दत्तात्रेय कोळी, प्रवीण नेमिष्टे, सारंग काकडे, आशासेविका यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला होता.

फोटो ओळी : यड्राव (ता. शिरोळ) येथे मलेरियाप्रतिबंधक भरारीपथकाने पाहणी केली. याप्रसंगी भरारीपथकाचे सदस्यांसह राजवर्धन नाईक-निंबाळकर, दत्तात्रेय कोळी, प्रवीण नेमिष्टे, सारंग काकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: Inspection by Malaria Prevention Squad in Yadrav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.