मंडळांनी उभारलेल्या मांडवांची आजपासून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:35+5:302021-09-08T04:30:35+5:30
कोल्हापूर : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी रस्ता व्यापत मोठे उभारले नाहीत ना, वाहतुकीला अडथळा, ध्वनिप्रदूषण होत नाही ना, परिसरातील नागरिकांना ...
कोल्हापूर : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी रस्ता व्यापत मोठे उभारले नाहीत ना, वाहतुकीला अडथळा, ध्वनिप्रदूषण होत नाही ना, परिसरातील नागरिकांना काही त्रास होत नाही, याची तपासणी आज मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी याबाबतचे आदेश काढले. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांकडून महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त जागा व्यापत मोठे मांडव उभारले जातात. ते भर रस्त्यात उभारले गेल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होतो. मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टिममुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यावर बंधने आणावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका २०१६मध्ये दाखल झाली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला. त्यानुसार गेल्या वर्षीपासून अधिकारी, अभियंत्यांकडून मंडळांची तपासणी केली जात आहे. यावर्षीदेखील या तपासणीसाठी शहर जिल्ह्यात २० अधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्या त्या परिसरातील पोलीस ठाण्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली.
---
महापालिकेचा नकार
हे तपासणी कामासाठी शहरात अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेने मात्र मंगळवारी त्याला नकार देत अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. सध्या सर्व अभियंत्यांवर अतिरिक्त कार्यभार आहे. वॉर्डस्तरावरील नोडल अधिकारी, लसीकरणाने नियोजन अशी अनेक कामे असल्याने त्यांना हे शक्य नाही, असे पत्र शहर अभियंत्यांनी करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना पाठवले आहे.
----