पन्हाळा रस्त्याची मुंबई पालिकेच्या प्रमुख अभियंत्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:22+5:302021-07-28T04:24:22+5:30

पन्हाळा : ...

Inspection of Panhala Road by Chief Engineer, Mumbai Municipal Corporation | पन्हाळा रस्त्याची मुंबई पालिकेच्या प्रमुख अभियंत्यांकडून पाहणी

पन्हाळा रस्त्याची मुंबई पालिकेच्या प्रमुख अभियंत्यांकडून पाहणी

Next

पन्हाळा : पन्हाळगडावरील भूस्खलनाने खचलेल्या रस्त्याची पाहणी मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता के. टी. पाटील व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय काटकर आणि उपअभियंता सी. ए. आयरेकर यांनी केली.

खचलेल्या भागाची दुरुस्ती कोणत्या पद्धतीने करावी याच्या सूचना अभियंता पाटील यांनी दिल्या. तसेच दुरुस्ती करून कच्चा रस्ता तयार करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या कामाची सुरुवात लगेच केली जाईल. खचलेला भाग सोडून पश्चिम बाजूच्या तटबंदीला लागून छोटा रस्ता करून लोकांना चालत जाता येईल अशी व्यवस्था करता येईल, असा पर्याय अधीक्षक अभियंता माने यांनी सुचविला. भूस्खलन झालेल्या परिसराच्या मध्यावर नैसर्गिक दगडी शिळा असून त्या पायावर कायमस्वरूपी आरसीसी भिंत बांधता येणे सहजशक्य आहे. त्याला खर्चही जादा येणार आहे. पन्हाळा-बुधवार पेठ उड्डाणपूल करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने उड्डाणपुलाबाबत सध्या आपण काहीही सांगणे हे धाडसी विधान होईल. मात्र खचलेल्या भागातील दगडी शिळेवरून बांधकाम लवकरात लवकर करीत असल्याचे सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक अभियंता एस. एस. माने यांनी सांगितले.

रेडेघाट परिसराची पाहणी नगरपरिषदेचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी करून हा मार्ग दुचाकी आणि हलक्या चार चाकी गाड्यांसाठी तात्पुरता पर्यायी मार्ग म्हणून योग्य दुरुस्ती करून खुला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक चेतन भोसले, रवींद्र धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खारगे उपस्थित होते.

२७ पन्हाळा इंजिनिअर पाहणी

फोटो ओ‌ळी : मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता के. टी. पाटील यांची पन्हाळा येथील भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट दिली.

Web Title: Inspection of Panhala Road by Chief Engineer, Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.