शहरातील रस्ते खडीकरण कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:04+5:302021-06-10T04:17:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अमृत योजनेतर्गंत शहर पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी पिण्याचे पाइपलाइन टाकण्याचे काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अमृत योजनेतर्गंत शहर पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी पिण्याचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदाई केलेला रस्ता संबंधित ठेकेदाराकडून करून घेतला जात आहे. या कामाची पाहणी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी केली.
संभाजीनगर स्टॅण्ड ते देवकर पाणंद चौक, हॉकी स्टेडियम चौक ते यल्लमा मंदिर रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामांची पाहणी डॉ. बलकवडे यांनी केली. खोदाई केलेल्या रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता अजय साळुंखे, उपअभियंता प्रभाकर गायकवाड, शाखा अभियंता पी. डी. माने, भास्कर कुंभार, संजय नागरगोजे यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.
चौकट
जबाबदारी ठेकेदाराची
रस्त्याचे काम करताना अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहील. ठेकेदारांनी काळजीपूर्वक गतीने काम पूर्ण करावे, अशीही सूचना डॉ. बलकवडे यांनी केल्या.
फोटो : ०९०६२०२१-कोल- पाहणी
कोल्हापुरातील रस्ता कामाची पाहणी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह केली.