वारणा दूध संघामार्फत दोन हजार जनावरांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:05+5:302021-08-12T04:28:05+5:30

येथील वारणा दूध संघ व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ यांच्या वतीने पूरग्रस्त गावात जनावरांसाठी मोफत सर्व रोग ...

Inspection of two thousand animals by Warna Dudh Sangh | वारणा दूध संघामार्फत दोन हजार जनावरांची तपासणी

वारणा दूध संघामार्फत दोन हजार जनावरांची तपासणी

Next

येथील वारणा दूध संघ व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ यांच्या वतीने पूरग्रस्त गावात जनावरांसाठी मोफत सर्व रोग निदान तपासणी परिसरातील दोन हजार जनावरांवर उपचार करण्यात आले. वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, संचालक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय विभागाने हे नियोजन केले होते.

वारणा परिसरातील निलेवाडी जुने पारगाव, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, सागाव, आदी गावांत घरोघरी गोठ्यावर जाऊन पशुवैद्यकीय डॉक्टर व त्यांच्या पथकाने जनावरांची आरोग्य तपासणी करून उपचार केले.

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिगे, डॉ. मेश्राम, डॉ. कविता खिलारे, डॉ. शलाका सागवेकर, डॉ. भोकरे, डॉ. अंबोरे, डॉ. मोटे, डॉ. अगविले तसेच ‘वारणा’चे डॉ. जे. बी. पाटील, डॉ. नागोजीराव वडजे, डॉ. अशोक कोटगिरे, प्रयोगशाळातज्ज्ञ पीजी व अंतिम वर्षाचे २५ विद्यार्थी यांनी चांगल्या प्रकारे काम करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

फोटो ओळी-

वारणा दूध संघामार्फत जनावरांसाठी आरोग्य महाशिबिरप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केला. यावेळी संचालक प्रदीप देशमुख, शिवाजी जंगम, माधव गुळवणी, महेंद्र शिंदे, अधिष्ठाता डॉ. धनंजय दिगे, आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of two thousand animals by Warna Dudh Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.