गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर वाहन व प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:44+5:302021-02-24T04:25:44+5:30

संकेश्वर : कोरोनाची दुसरी लाट व पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की टाळण्यासाठी गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हिटणी नाका येथे सर्व प्रवासी ...

Inspection of vehicles and passengers on Gadhinglaj-Sankeshwar route | गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर वाहन व प्रवाशांची तपासणी

गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर वाहन व प्रवाशांची तपासणी

Next

संकेश्वर :

कोरोनाची दुसरी लाट व पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की टाळण्यासाठी गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हिटणी नाका येथे सर्व प्रवासी व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आज, मंगळवारी दुपारी ३ पर्यंत सुमारे २१० वाहनांमधील ८०० हून अधिक नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग केले. त्यामध्ये ताप असलेल्या ७ नागरिकांना माघारी पाठविले. याठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.

मार्गावर ये-जा करणारी वाहने, त्यांचा क्रमांक व कुठून आले व कुठे जाणार याची सर्व माहिती घेऊनच वाहन व प्रवाशांना पुढे सोडण्यात येत आहे. तपासणी केंद्रास सहाय्यक पोलीस अधिकारी आर. जी. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय कुडची यांनी भेट दिली.

----------------------------------------

* फोटो ओळी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हिटणी (ता. गडहिंग्लज) नजीक बसमधील प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करताना आरोग्य कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात वाहन व प्रवाशांची माहिती घेताना पोलीस कर्मचारी.

क्रमांक : २३०२२०२१-गड-०३/०४

Web Title: Inspection of vehicles and passengers on Gadhinglaj-Sankeshwar route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.