किणी तपासणी सेंटरवर वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:23+5:302021-04-25T04:25:23+5:30
ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत शासनाने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार दुसऱ्या जिल्ह्यातील वाहनांना अत्यावश्यक ...
ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत शासनाने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार दुसऱ्या जिल्ह्यातील वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा प्रवेश बंदीचा निर्णय लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर किणी (ता. हातकणंगले) येथील टोलनाक्यावर पोलीस प्रशासनाने बँरिकेड्स लावून नाकाबंदी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांची चौकशी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सबळ कारणाशिवाय येणाऱ्या वाहनधारकांना परत पाठविण्यात येत असल्याचे पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले.
दरम्यान, याठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, तहसीलदार प्रदीप उबाळे ,गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी टोलनाक्यावरील तपासणी कक्षास भेट देऊन पाहणी केली.