पोलीस महानिरीक्षकांची मॅकला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:54+5:302021-03-18T04:23:54+5:30
यावेळी मॅकचे अध्यक्ष गोरख माळी यांनी त्यांचे स्वागत केले आणि औद्योगिक वसाहतीमधील समस्यांचे निवेदन त्यांना दिले. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील ...
यावेळी मॅकचे अध्यक्ष गोरख माळी यांनी त्यांचे स्वागत केले आणि औद्योगिक वसाहतीमधील समस्यांचे निवेदन त्यांना दिले.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी समस्या मांडल्या. त्यामध्ये संस्थेमार्फत देण्यात आलेल्या गाडीमधून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंगचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पोलीस ठाणे उभारणीसाठी मिळालेल्या भूखंडावर पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू करावे, लक्ष्मी टेकडी येथे अपघात होऊ नये याकरिता सकाळी व सायंकाळी वाहतूक पोलीस यांची नियुक्ती करण्यात यावी, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमण काढण्यात यावे, संस्थेमार्फत देण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये नियमितपणे कर्मचारी वर्ग असावेत. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सीसीटीव्ही बसविणे, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील अवैध धंदे बंद करावेत, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोलिंग विशेषत: सोमवारी सुटीदिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये स्क्रॅप व इतर साहित्य गोळा करण्याकरिता येणाऱ्या महिलांना एमआयडीसीमध्ये येणे बंद करावेत.
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील घडत असलेले गुन्हे, अपघात व इतर बाबींची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे नोंद करून घेण्यात यावेत.
वरील उद्योजकांच्या असणाऱ्या समस्या मॅकच्या माध्यमातून मनोजकुमार लोहिया यांच्यासमोर मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, उपाध्यक्ष संजय पेंडसे, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, मुबारक शेख, प्रवीण पराळे, डकरे व इतर मान्यवर सभासद बंधूंनी मांडल्या.
मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मॅकच्या उपस्थित मान्यवर सभासदांशी सविस्तरपणे चर्चा केली व उद्योजकांचे विषय सोडविण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करीन, असे सांगितले. तसेच उद्योजक व कामगार बंधूंच्या समस्यांबाबत नेहमीच पोलीस कार्यालयाचे सहकार्य राहील, असे सांगितले.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे पोलीस उपाधीक्षक आर. आर. पाटील, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, गोकुळ शिरगावचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपाध्यक्ष संजय पेंडसे, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, प्रताप परुळकर, स्वि. संचालक अमृतराव यादव, निमंत्रित सदस्य कुमार पाटील, शिवाजी भोसले, संगमेश पाटील, मुबारक शेख, तसेच मान्यवर सभासद जयराज पाटील, विजय कोंडाळकर, प्रवीण पराळे, विजयन रमेश, चंद्रकांत खोत, डकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार मॅकचे उपाध्यक्ष संजय पेंडसे यांनी मानले.