शिरोली औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:33 AM2021-02-26T04:33:41+5:302021-02-26T04:33:41+5:30
शिरोली: उद्योगांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्योजकांनी संपूर्ण शिरोली औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. ...
शिरोली:
उद्योगांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्योजकांनी संपूर्ण शिरोली औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी केले. ते शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)मध्ये आयोजित सदिच्छा भेट व सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक पाटील म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात छोट्या-मोठ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी उद्योजकांनी स्वतःच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून चोरी झाली तरी चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होईल आणि भविष्यात चोरीला आळा बसेल. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष दीपक पाटील, संचालक एम. वाय. पाटील, जयदीप चौगुले, रवी बोली, बी. एम. सोमय्या, भीमराव खांडे उपस्थित होते.
फोटो : २५ शिरोली स्मॅक
शिरोली स्मॅकला करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष दीपक पाटील व संचालक उपस्थित हाेते.