मणेरमळ्यात हनुमान, गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:59+5:302021-09-04T04:27:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यातील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने लोकसहभागातून आकाराला आलेल्या गणेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यातील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने लोकसहभागातून आकाराला आलेल्या गणेश मंदिरात हनुमान व गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. लोकवर्गणीतून भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. कुडाळ येथून कृष्णशीला दगडात घडविलेल्या दोन्ही देवतांच्या मूर्ती भाविकांची लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या उभारणीसाठी पंधरा महिन्यांचा कालावधी लागला. याकरिता समाजातील विविध घटकांकडून, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सढळ हस्ते लोकवर्गणी दिली. मंदिराच्या उभारणीत ज्यांनी-ज्यांनी सहभाग घेतला, त्याचे गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजित माने यांनी आभार मानले. समारंभासाठी
अध्यक्ष अजित माने, उपाध्यक्ष प्रदीप मच्छलेे, खजानीस संजय सुतार व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट : सर्वच घटकांतील लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, देणगीदार यांनी दिलेल्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
अत्यंत सुंदर असे मंदिर उभारल्याने अनेक भक्तांनी मंडळाचे कौतुक केले आहे.
फोटो : लोकवर्गणी व लोकसहभागातून साकारलेल्या मणेर मळ्यातील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टकडून हनुमान व गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.