मौजे वडगाव येथे संस्थात्मक अलगीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:25+5:302021-06-05T04:17:25+5:30
हेरले : मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रास अत्यावश्यक मदत करण्यास आपण ...
हेरले : मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रास अत्यावश्यक मदत करण्यास आपण कटिबद्ध आहे, असे आश्वासन जि. प. सदस्य दलितमित्र अशोकराव माने यांनी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी दिले.
मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला जि. प. सदस्य दलितमित्र अशोकराव माने यांनी बेडची व्यवस्था केली. या अलगीकरण केंद्राचे उद्घाटन माने यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष आकीवाटे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी किरण चौगुले, आश्विनी लोंढे, अविनाश पाटील, पोलीस पाटील अमीर हजारी, डाॅ. विजयकुमार गोरड, अवधूत मुसळे, महेश कांबरे, सर्जेराव सावंत, प्रकाश कांबरे, विनायक चौगुले, विजय मगदूम, ग्रामविकास अधिकारी प्रशांत मुसळे, तलाठी संदीप बरगाले, कोतवाल महंमद जमादार यांच्यासह एम. आर. असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, ग्रामस्थ उपस्थित होते.
०४ मौजे वडगाव माने सेंटर
फोटो : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून संस्थात्मक अलगीकरण केंद्राचे उद्घाटन करत असताना दलितमित्र अशोकराव माने, सरपंच काशिनाथ कांबळे व इतर.