रस्त्यावरील बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:10+5:302021-03-19T04:23:10+5:30
कोल्हापूर : शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या जपणुकीकरिता शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करून योग्य पद्धतीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना गुरुवारी महानगरपालिकेत ...
कोल्हापूर : शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या जपणुकीकरिता शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन करून योग्य पद्धतीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या कृती दलाच्या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृती दल अध्यक्ष तथा उपायुक्त शिल्पा देरकर होत्या.
कृती दलाने करावयाच्या सर्वेक्षणासंबंधीची सविस्तर महिती बैठकीत देण्यात आली. शहरातील बस स्टँड, वीटभट्टी, रेल्वे स्टेशन तसेच कारागीरांची कामे ज्या ठिकाणी केली जातात इत्यादी ठिकाणांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात यावा. सर्वेक्षणात बालकाचे नाव, लिंग, शिक्षण, अनाथ, एकपालक, द्विपालक, आरोग्य, आजार, निवारा इ. बाबींचा समावेश करण्यात यावा. बालकांचा पुनर्वसनाचा प्रश्न फार गंभीर आहे तो सोडविण्यात यावा, बालकांच्या पालकांना ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्याकडून निवारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हा महिला बाल कल्याण विभागाचे सागर दाते यांनी केल्या.
यावेळी डॉ. संजना बागडी, रोहित सोनुले, रसूल पाटील, एस.जी. लाड आदी उपस्थित होते. यांनी केले. बालकल्याण विभागाच्या अधीक्षिका प्रीती घाटोळे यांनी सर्वांचे आभार मानले.