हा तर शाहू महाराज, शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:45+5:302021-06-29T04:17:45+5:30

गोमुत्र शिंपण्याचा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान आहे. बहुजन समाज याचे योग्यवेळी ...

This is an insult to Shahu Maharaj, Shahu Bhakt Bahujan Samaj | हा तर शाहू महाराज, शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान

हा तर शाहू महाराज, शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान

Next

गोमुत्र शिंपण्याचा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान आहे. बहुजन समाज याचे योग्यवेळी चोख पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुरगूडमधील शाहूभक्त व शाहूप्रेमी नागरिकांकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा उत्तम नमुना असलेल्या राधानगरी येथे धरणस्थळी जाणीवपूर्वक घातलेली बंदी झुगारून शाहूभक्त जनतेने मोठ्या उत्साहात शाहू जयंती साजरी केली. शाहू फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन व पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून त्यांच्याच नावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडळींना व त्यांच्या नेत्यांना हे चांगलेच खुपले आहे म्हणूनच ते गोमुत्र शिंपण्याचा कार्यक्रम करणार असल्याचे म्हणत आहेत,बरे झाले, या निमित्ताने पुरोगामी विचारांच्या नेत्याला, त्यांच्या पक्षाला व कार्यकर्त्यांना निदान या निमित्ताने पवित्र गोमुत्राची आठवण झाली.

प्रसिद्धी पत्रकावर अनंतराव फर्नांडिस, विजय राजिगरे, सुशांत मांगोरे, अमर चौगले, भाजप उपाध्यक्ष अमर चौगले, सदाशिव गोधडे, युवराज कांबळे, दगडू कांबळे, राहुल कांबळे, मयूर सावर्डेकर, जॉन्सन फर्नांडिस, अनिल अर्जुने, सुहास दरेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: This is an insult to Shahu Maharaj, Shahu Bhakt Bahujan Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.