ऊसतोड कामगाराच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:52+5:302021-05-08T04:24:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फे ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
पोर्ले तर्फे ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर अक्षय आनंदा पाटील (रा. यवलूज ता. पन्हाळा) यांचा अपघातात मृत्यू झाला होता. या ऊसतोड मंजुराला युनायटेड इंडिया विमा कंपनीकडून मिळालेला तीन लाखाचा धनादेश कंपनीचे युनिट हेड एन. सी. पालीवाल यांच्या हस्ते त्यांचे वडील आनंदा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दालमिया कंपनी कारखान्यास ऊसतोड करणाऱ्या मजुरांचे सुरक्षा कवच म्हणून विमा उतरवतात. हंगाम सुरू असताना ऊसतोडीसाठी जात असताना अक्षय पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षात विमा कंपनीच्या माध्यामातून पाच ऊसतोड मजुरांना विमा कवचे संरक्षण दिले असल्याची माहिती युनिट हेड पालीवाल यांनी सांगितले.
याप्रसंगी युनिट हेड एन.सी पालीवाल, जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, वरिष्ठ मॅनेजर (केन) संग्राम पाटील, तानाजी पोवार, के. डी. पाटील, आनंदा पाटील, सरदार चौगुले आदी उपस्थित होते.