शिवार कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:28+5:302021-05-25T04:29:28+5:30

कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेला आधार मिळावा, या हेतूने शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, भरत मेडिकल ट्रस्ट, ...

Insurance of Shivar Kovid Center employees | शिवार कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा विमा

शिवार कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा विमा

Next

कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेला आधार मिळावा, या हेतूने शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, भरत मेडिकल ट्रस्ट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक घटकाकडून या सेंटरसाठी मदत करण्यात येत आहे.

माजी खासदार शेट्टी हे सेंटरमध्ये उपस्थित राहून येथील कामाचा आढावा घेतात; तर कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोरोनाबाधित रुग्णांना मदत करण्याच्या हेतूने सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व स्वयंसेवक यांचा विमा उतरविण्याचे काम व्यवस्थापनाने केले आहे.

फोटो - २४०५२०२१-जेएवाय-१३

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शिवार कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना माजी खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते गुलाबपुष्प देण्यात आले.

Web Title: Insurance of Shivar Kovid Center employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.