महापौरपदासाठी इच्छुकांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:13 AM2018-12-03T00:13:24+5:302018-12-03T00:13:28+5:30
कोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक विश्वेश्वरय्या हॉल येथे होत आहे. भाजप-ताराराणी ...
कोल्हापूर : महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक विश्वेश्वरय्या हॉल येथे होत आहे. भाजप-ताराराणी आघाडीची बैठक उद्या, मंगळवारी होत आहे. महापौर पदावर चौघांनी दावा सांगितल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला असून, इच्छुकांची घालमेलही वाढली आहे.
दरम्यान, ‘स्थायी’मधील अनुभव पाठीशी असल्याने आमदार हसन मुश्रीफ यांनी कामलीची सावध भूमिका घेतली आहे. सरिता मोरे व अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना सहा-सहा महिन्यांची संधी देऊन तिढा सोडविता येईल; पण पहिल्यांदा कोणाची वर्णी लावायची हा पेच कायम राहणार आहे.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार यंदा महापौरपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. या पदासाठी सरिता मोरे, अॅड. सूरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी, अनुराधा खेडकर इच्छुक आहेत. पाच वर्षांत राष्ट्रवादीला दोनच वेळेला महापौरपद, तर तीनवेळा स्थायी समिती सभापतिपद मिळणार आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, या ईर्ष्येने चारही इच्छुकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. लाटकर व मोरे हेच महापौर पदासाठी प्रबळ दावेदार असून, राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणात कोण बाजी मारणार हा उत्सुकतेचा विषय आहे. भाजप-ताराराणीकडून महापौर पदासाठी जयश्री जाधव, सविता भालकर व भाग्यश्री शेटके यांची नावे चर्चेत आहेत. उपमहापौर पद कॉँग्रेसकडे जाणार असून, यासाठी भूपाल शेटे, श्रावण फडतरे व अशोक जाधव यांनी ताकद लावली आहे.
दरम्यान, महापौर व उपमहापौर पदांसाठी बुधवारी (दि. ५) अर्ज भरण्यात येणार असून, १० डिसेंबरला निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांची आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे मते आजमावून घेणार आहेत. त्यानंतर उद्या, मंगळवारी बैठक घेऊन बुधवारी (दि. ५) सकाळीच उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे.
‘स्थायी’साठी ‘हबकी’ डाव
राष्ट्रवादीकडे महापौरपद एक वर्षासाठी आणि इच्छुक पाच आहेत. त्यामुळे ज्याचे राजकीय वजन जास्त त्यांनाच संधी मिळणार, हे निश्चित आहे. फारच ताणाताणी झाली तर महापौरपद नसेना, वर्षानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याचे स्थायी समितीच्या सभापतिपदी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांमधील काहींनी नेत्यांवर ‘हबकी’ डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना मिळाली संधी
हसिना फरास (महापौर), महेश सावंत (उपमहापौर), सुनील पाटील (उपमहापौर), मुरलीधर जाधव (स्थायी सभापती), शमा मुल्ला (उपमहापौर), वहिदा सौदागर (महिला, बालकल्याण), अजिंक्य चव्हाण (शिक्षण सभापती)
उपमहापौरसाठी यांनी ताकद लावली पणाला
फॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद कॉँग्रेसकडे जाणार असून, यासाठी भूपाल शेटे, श्रावण फडतरे व अशोक जाधव यांनी ताकद लावली आहे. उपमहापौरसाठी यांनी ताकद लावली पणाला
फॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद कॉँग्रेसकडे जाणार असून, यासाठी भूपाल शेटे, श्रावण फडतरे व अशोक जाधव यांनी ताकद लावली आहे.