‘एकीकरण’चा बालेकिल्ला दुहीमुळे सर होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:55 AM2018-04-09T00:55:58+5:302018-04-09T00:55:58+5:30

'Integration' was a reminder of the fortress of the fort! | ‘एकीकरण’चा बालेकिल्ला दुहीमुळे सर होईना !

‘एकीकरण’चा बालेकिल्ला दुहीमुळे सर होईना !

Next

प्रकाश बिळगोजी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून नव्याने हा ग्रामीण मतदारसंघ बनला आहे. कट्टर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते या मतदारसंघात मोडतात. समिती, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पुन्हा एकदा या मतदारसंघात होणार आहे. मागील २०१३ च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि समितीत या तिन्ही पक्षात बंडखोरी झाली होती. यात भाजपचे संजय पाटील विजयी झाले होते.
अशी असेल लढत
या मतदारसंघात राज्य महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेसमधून, तर आमदार संजय पाटील हे भाजपमधून आणि एकीकरण समितीतून माजी आमदार मनोहर किणेकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांची एन्टी इंकम्पसी फॅक्टर म्हणून विद्यमान आमदार संजय पाटील यांनी मतदारसंघ बदल करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, तर एकीकरण समितीतूनदेखील किणेकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी होत आहे. तसे न झाल्यास मागील निवडणुकीप्रमाणेच लढत असेल.
बंडखोरीची शक्यता
या मतदारसंघात जसे मराठी माणसात एकमत न झाल्यास समितीच्या दोन्ही गटातील उमेदवार समोरासमोर उभे राहू शकतात, तर दुसरीकडे काँग्रेसमध्येदेखील माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक शिवनगौडा पाटील यांनी निधर्मी जनता दलात सामील होऊन आपली उमेदवारी नक्की केली आहे. भाजपमध्ये केजीपी-भाजप या निवडणुकीत एक झाले तरी जनसंपर्क कमी पडल्याने एन्टी इंकम्पसीमुळे विद्यमान भाजप आमदारांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही.
मराठी अस्मिता आणि विकास हीच मुख्य कारणे या मतदारसंघात येतात. पश्चिम भाग ९० टक्के मराठी भाषिक मतदार आहे, तर पूर्व भागातील अर्धा भाग मराठी आहे, त्यामुळे मराठीचे प्राबल्य या मतदारसंघावर आहे. एकीकरण समितीत एकी झाल्यास एकास एक उमेदवार आल्यास या मतदारसंघात समितीला विजय मिळवणे सोपे जाईल, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच ग्रामीण मतदारसंघातील गावागावांतून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मुख्यत: समिती विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात दिसण्याची चिन्हे आहेत.

Web Title: 'Integration' was a reminder of the fortress of the fort!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.