इंजुबाई पाणंद रस्ता डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:42+5:302021-08-24T04:29:42+5:30
याबाबतचे निवेदन प्रकाश वास्कर यांनी पदाधिकाऱ्यांच्या समवेत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड, गारगोटी यांना दिले. या सोबत या परिसरातील ...
याबाबतचे निवेदन प्रकाश वास्कर यांनी पदाधिकाऱ्यांच्या समवेत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुदरगड, गारगोटी यांना दिले. या सोबत या परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे पत्रही जोडण्यात आले आहे.
निवेदनातील आशय असा, साई मंदिर ते इंजुबाई मंदिरपर्यंतचा हा पाऊण किमीचा मार्ग गेले दीड वर्षे दुरुस्तीविना पडून आहे. सन २०१३-१४ साली या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर एकदाही काम झाले नाही. केवळ खड्डे बुजवत गेले, पण परत ये रे माझ्या, म्हणत हा रस्ता कमालीचा खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सर्व प्रवासी, शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करतात. छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर होत असतात. त्यामुळे हा रस्ता आता दिवाळीपूर्वी डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन बांधकाम विभागाच्या अभियंता स्नेहल पाटील यांना दिले.
यावेळी प्रकाश वास्कर, अक्षय सावंत, दीपक कांबळे, आकाश देसाई, रोहन भाट आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्नेहल पाटील यांना निवेदन देताना प्रकाश वास्कर, अक्षय सावंत, रोहन भाट आदी.