शहरात वाहन तपासणी मोहीम केली तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:53 AM2021-05-14T10:53:44+5:302021-05-14T10:55:52+5:30

CoronaVirus Kolhapur Trafic : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी केल्यामुळे गुरुवारी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरातील ताराराणी चौकात, व्हिनस कॉर्नर आदी प्रमुख चौकात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे त्यांनी थांबून अचानक नाकाबंदी केली. मोहिमेदरम्यान अनेक वाहनांवर जप्तीची आणि दंडात्मक कारवाई केली आहे.

Intensified vehicle inspection campaign in the city | शहरात वाहन तपासणी मोहीम केली तीव्र

कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने गुरुवारी वाहन तपासणी मोहीम अचानक तीव्र केली. व्हिनस कॉर्नर चौकात वाहनचालकांची अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह पोलीस फौजफाटा कारवाईसाठी कार्यरत होता. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देशहरात वाहन तपासणी मोहीम केली तीव्र कारवाईत दंडूकशाही : प्रमुख चौकात कारवाई

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी केल्यामुळे गुरुवारी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरातील ताराराणी चौकात, व्हिनस कॉर्नर आदी प्रमुख चौकात अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे त्यांनी थांबून अचानक नाकाबंदी केली. मोहिमेदरम्यान अनेक वाहनांवर जप्तीची आणि दंडात्मक कारवाई केली आहे.

बाहेर गावाहून विनाकारण कोल्हापूर शहरात येणारे आणि जाणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार गुरुवारी शहरातील विविध चौकांत वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली. गुरुवारी शहरातील ताराराणी चौक, व्हिनस कॉर्नर आदी प्रमुख चौकात अचानक नाकाबंदी करून सरसकट सर्वच वाहनांची तपासणी केली.

यादरम्यान विनामास्क वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली. स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सकाळपासून बंदोबस्त लावून या चौकात कारवाईचा धडाका लावला. मोहिमेत वाहन परवाना तपासणीपासून शहरात कोणत्या कामासाठी आला, कोठे निघाला, याची चौकशी करण्यात आली.

विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच वाहनांवर जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पो. नि. स्नेहा गिरी आणि २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 

Web Title: Intensified vehicle inspection campaign in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.