बिया निर्मिती बँक स्थापन करण्याचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:03+5:302021-07-09T04:17:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : वातावरणातील बदल व अन्य कारणांमुळे माणसांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे. अशावेळी निरोगी व तंदुरुस्त ...

The intention is to set up a seed production bank | बिया निर्मिती बँक स्थापन करण्याचा मानस

बिया निर्मिती बँक स्थापन करण्याचा मानस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : वातावरणातील बदल व अन्य कारणांमुळे माणसांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे. अशावेळी निरोगी व तंदुरुस्त शरिरासाठी चांगला व सकस आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे देशी वाणाच्या बिया संकलित करून त्यांची लागवड करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. आगामी काळात महिलांच्या पुढाकारातून दुर्मीळ देशी वाण बिया निर्मिती बँक स्थापन करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

शिरोळ येथे दत्त कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाऊंडेशनच्यावतीने शेडशाळ (ता. शिरोळ) येथील महिला बचत गटांच्या महिलांची देशी वाण बियाण्यांची लागवड व संगोपन याविषयी दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी काळात देशी वाण बियांची बँक स्थापन करण्याबाबत महिलांनी सर्वानुमते मान्यता दिली.

यावेळी शमा पठाण, जयश्री शिरढोणे, आक्काताई मगदूम, मालन आवळे, सुरेखा मानकापुरे, सुनीता कोळेकर, भय्यासाहेब पाटील, ए. एस. पाटील, रवी पवार, काका चौगुले, संजय मगदूम, सुरेश केरीपाळे, महेश चौगुले, ऋषिकेश मिठारी, रावसाहेब चौगुले उपस्थित होते.

फोटो - ०८०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - शिरोळ येथे दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The intention is to set up a seed production bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.