आंतरभारतीचे सचिव पाटोळे पसार आत्महत्या प्रकरण : दिसताक्षणी होणार अटक

By admin | Published: May 11, 2014 12:24 AM2014-05-11T00:24:38+5:302014-05-11T00:24:38+5:30

कोल्हापूर : वसंतराव चौगुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दत्तात्रय जाधव (वय ५५, रा. विचारेमाळ) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या

Inter-Secretary Secretary Patole Pasar suicide case: Attacks will be arrested | आंतरभारतीचे सचिव पाटोळे पसार आत्महत्या प्रकरण : दिसताक्षणी होणार अटक

आंतरभारतीचे सचिव पाटोळे पसार आत्महत्या प्रकरण : दिसताक्षणी होणार अटक

Next

 कोल्हापूर : वसंतराव चौगुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दत्तात्रय जाधव (वय ५५, रा. विचारेमाळ) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी पाटोळे यांचा पोलीस शोध घेत असून ते मिळून आलेले नाहीत. त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा ठावठिकाणाही सापडत नाही. दिसताक्षणी त्यांना अटक करणार असल्याचे शाहूपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये पाटोळे यांनी नातेवाईक लिपिकाला वाचविण्यासाठी जाधव यांना दंड भरण्यासाठी तगादा लावल्याचे पुढे येत आहे. त्यासाठी पोलीस संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे जाब-जबाब घेत आहेत. पाटोळे यांच्या विरोधात जाधव यांचे पती दत्तात्रय जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Inter-Secretary Secretary Patole Pasar suicide case: Attacks will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.