इंटरसिटी एक्स्प्रेसला मिळणार तीन थांबे !

By admin | Published: March 26, 2017 10:07 PM2017-03-26T22:07:31+5:302017-03-26T22:07:31+5:30

सेवेत आणखी एक रेल्वे : कऱ्हाड, सातारा, लोणंदच्या प्रवाशांची होणार सोय

Intercity Express will stop three stops! | इंटरसिटी एक्स्प्रेसला मिळणार तीन थांबे !

इंटरसिटी एक्स्प्रेसला मिळणार तीन थांबे !

Next



जगदीश कोष्टी ल्ल सातारा
शैक्षणिक, औद्योगिकीकरणामुळे रोजगाराचे केंद्र बनलेले पुणे आणि सातारा ही शहरे एकच होऊ लागले आहेत. हजारो सातारकर दररोज पुण्याला ये-जा करतात. मात्र रेल्वेच्या गाड्या कमी असल्याने सातारकरांना एसटीचा आधार घ्यावा लागतो. सातारकरांच्या सेवेत आणखी एक नवीन रेल्वे दाखल होत आहेत. नियोजित कोल्हापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला जिल्ह्यात तीन थांबे मिळू शकतात.
शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने साताऱ्यातील हजारो युवक पुण्यात स्थानिक झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्याला जायचे म्हटले तरी त्रासदायक होत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. साहजिक सातारकरांची ओढ आणखी वाढली. त्यामुळे ही दोन शहरे मनाने एकच झाली आहेत.
दळणवळणात रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कमी खर्चात हवे तेथे प्रवास करण्याची सुविधा रेल्वेमुळे उपलब्ध झाली आहे. एसटी आणि रेल्वेच्या प्रवास दरात सरासरी निम्म्याने फरक पडतो. एसटीचा प्रवास दिवसेंदिवस महागत चालला आहे. त्यामुळे एसटीचे प्रवासी कमी होत आहेत. साहजिकच गोरगरिबांना रेल्वेचा मोठा आधार वाटतो; परंतु रेल्वेच्या गाड्यांची संख्या कमी असल्याने नाईलाजाने एसटीचा आधार घ्यावा लागत आहे.
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू टर्मिनस येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सातारकरांसाठी सुखद धक्का दिला आहे. पुणे-कोल्हापूर इंटरसिटी एक्स्प्रेस लवकरच सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
कऱ्हाड शहराची नाळ कोल्हापूरशी जोडली गेली आहे. कऱ्हाड कोल्हापूर हे केवळ पन्नास किलोमीटरचे अंतर असल्याने काम करून लोक दोन-चार तासांत कऱ्हाडला येतात. इंटरसिटी एक्स्प्रेसला कऱ्हाडला थांबा मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळू शकतात. त्याचप्रमाणे प्रवाशांचीही सोय होणार आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीवर पडणारा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
कमी वेळेत
पुणेवारी
सातारा रेल्वे स्थानकातून आजच्या स्थितीला दररोज सरासरी पाचशे लोक प्रवास करतात. पॅसेंजरने पुण्याला जाण्यासाठी पाच ते साडेपाच तास लागतात. हा प्रवास एक्स्प्रेसने साडेतीन तासांत होणार आहे.
जंक्शनमुळे लोणंदला न्याय
पुणे-मिरज लोहमार्गावर लोणंदला जंक्शन होणार आहे. फलटण, बारामती लोहमार्ग लोणंदला जोडल्यास कोल्हापूरहून बारामती, दौंड, अहमदनगरकडे जाणाऱ्यांना पुण्याला जावे लागणार नाही. लोणंदला उतरून ते दौंडला जाऊ शकतात. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसला लोणंदला थांबा मिळणार आहे.
तिकीटमात्र निम्म्यावर
साताऱ्याहून मिरजला एसटीने जाण्यासाठी सरासरी दीडशेच्या आसपास तिकीट आकारले जाते. हा प्रवास पॅसेंजरने केल्यास तीस रुपये तर एक्स्प्रेसने साठ ते पंच्चाहतर रुपयांमध्ये होतो. इंटरसिटी एक्स्प्रेसमुळे हा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

Web Title: Intercity Express will stop three stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.